सोलापूर : शहरातील चाटी गल्लीत एका बिल्डिंग मधील गॅसचा स्फोट झाल्याने जुने घर जळून खाक झाले. या आगीने आजूबाजूच्या घरांनी पेट घेतला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पहायला मिळाले. आग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
चाटी गल्ली मध्ये सुधा इडली गृहा च्या बोळ्यामध्ये असलेल्या एका जुन्या बिल्डिंगमध्ये दुपारी दोनच्या सुमारास गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आग लागली, सुदैवाने घरात कोणी नव्हते त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही या स्फोटामुळे संपूर्ण बिल्डिंगने पेट घेतला बिल्डिंग लाकडी असल्याने आग वाढली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बद्दल पाच ते सहा गाड्यांनी पाणी मारले, आग इतकी वाढली की शेजारच्या पाच ते सहा घरांनी पेट घेतला. आग विझवण्यात प्रशासनाला यश आले आहे मात्र संपूर्ण बिल्डिंग जळून खाक झाल्याचं चित्र आहे. नेमके नुकसान किती झाले याचा आकडा अजून समोर आला नाही.




















