सोलापूर : विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाची नव्याने सोलापुरात स्थापना करण्यात आली आहे.
आंबेडकरी समाजातील दुसऱ्या फळीतील बरेच नेते या मध्यवर्ती महामंडळाच्या खाली एकत्र आले आहेत. त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन जुन्या मध्यवर्ती मंडळावर आरोप केला होता, केवळ 14 एप्रिल ते मिरवणूक एवढेच सोडलं तर मध्यवर्ती कोणतेही वर्षभर कार्यक्रम करत नाही आणि समाजामध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून बोधिसत्व मध्यवर्ती महामंडळाच्या खाली एकत्रित आले आहेत असे सांगण्यात आले.
त्या प्रित्यर्थ 27 मार्च रोजी नॉर्थकोट मैदानावर वार्षिक बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मध्यवर्ती मंडळाच्या यापूर्वीच्या बैठका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल या ठिकाणी कट्ट्यावर व्हायच्या परंतु यंदा मध्यवर्ती महामंडळाचे नेतृत्व माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पुढाकार घेतल्याने भव्यदिव्य अशी बैठक आयोजित करून मध्यवर्ती महामंडळासह या नेत्यांनी आपले एकप्रकारे मार्केटिंगच करत असल्याचे काहीसे चित्र या वेळी दिसून आले.
बैठकीपूर्वी वातावरण निर्मिती करण्यासाठी ऑर्केस्ट्रा लावण्यात आला होता, सुमारे हजारहून अधिक लावण्यात आल्या आहेत. मोठे स्टेज मारण्यात आले आहे सर्वत्र निळे झेंडे लावून वातावरण निळे करण्यात आल्याचे पाहायला मिळालं.


















