सोलापूर : प्रभाग क्रमांक ३च्या नगरसेविका विजयलक्ष्मी गड्डम यांचे पती भारतीय जनता पार्टीचे माजी मंडल अध्यक्ष , धडाडी कार्यकर्ता आणि समाजसेवक, लक्ष्मीकांत गड्डम यांचे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने श्री मार्कंडेय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 42 होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली, आई,वडील, भाऊ असा परिवार आहे. जोडभावी पेठेत त्यांचे जुने घर आहे, सध्या ते विडी घरकुल भागात राहत होते अशी माहिती मिळाली. युवा व धडाडीचा कार्यकर्ता गेल्याने भारतीय जनता पक्षामधून दुःख व्यक्त केले जात आहे.
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

















