Wednesday, March 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांनी लोकसभेत केली ही मागणी

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
30 March 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पर्यटन मंत्रालयद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक सुविधा संवर्धन राष्ट्रीय मिशनच्या माध्यमातून अध्यात्मिक विरासत संवर्धन म्हणजेच प्रसाद योजनेअंतर्गत सोलापुरातील मंदिरांचा समावेश करावा. सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर, सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर व तुळजापुरचे तुळजाभवानी मंदिरांच्या विकासासाठी व तीर्थयात्रेकरुंच्या सुविधेसाठी या प्रसाद योजनेअंतर्गत समावेश  करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.  

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शून्य प्रहार काळात  करीत, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला तसेच पर्यटन मंत्री यांना याबाबतची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली. पर्यटन मंत्रालयद्वारे तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक सुविधा संवर्धन राष्ट्रीय मिशनची सुरुवात ऑक्टोबर 2017 मध्ये करण्यात आली. या योजनेस तीर्थयात्रा कायाकल्प आणि अध्यात्मिक विरासत संवर्धन म्हणजे प्रसाद योजना असे नामकरण केले. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील लाखो लोकांचे तिर्थ स्थळ असलेले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिर, हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर व तुळजापुरचे तुळजाभवानी हे पुरातन मंदिरे आहेत. हत्तरसंगकुडलचे हरिहरेश्वर मंदिर हे पुरातन असून तेथील मंदिरात एकाच शिवलिंगावर ३६५ शिवलिंगाचा समावेश आहे. असे शिवलिंग विश्वात एकच असून तेथील शिलालेख हा मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे. त्यामुळे या मंदिराच्या संवर्धनासाठी या मंदिरांचा समावेश प्रसाद योजनेत करणे आवश्यक असल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर म्हणाले.  

हि योजना राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारने ओळखलेल्या एजन्सीद्वारे कार्यान्वित केली जाते.  महत्त्वाच्या राष्ट्रीय/जागतिक तीर्थक्षेत्रे आणि वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वृद्धी. समुदाय आधारित विकासाचे अनुसरण करणे आणि स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.  वारसा शहराचा एकात्मिक पर्यटन विकास, स्थानिक कला, संस्कृती, हस्तकला, पाककृती इ.पायाभूत सुविधांची कमतरता दूर करण्यासाठी पर्यटन विकासाची समन्वय यंत्रणा मजबूत करण्यासाठी प्रसाद योजनेद्वारे कार्य केले जाते. या अंतर्गत, पर्यटन मंत्रालयाने ओळखलेल्या स्थळांवर पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारांना केंद्रीय आर्थिक सहाय्य (CFA) प्रदान केले जाते. या योजनेंतर्गत, सार्वजनिक वित्तपुरवठ्याच्या घटकांसाठी 100% निधी केंद्र सरकारद्वारे प्रदान केला जातो.  

सोलापूर जिल्हा हा अध्यात्मिक तीर्थस्थळांचा जिल्हा म्ह्णून प्रसिद्ध आहे परंतु अद्याप सोलापुरातील एकही प्राचीन मंदिराचा समावेश या योजनेत नाही. त्यामुळे मंदिरच्या संवर्धन व पर्यटन विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सोलापूरसह आसपास परिसरातील प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी प्रसाद योजनेत समावेश करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर झेडपी सीईओ स्वामींची अशीही संवेदनशीलता ; घरात दुःखाचा दिवस, त्यातही शाळांबाबत घेतलेल्या महत्वाच्या निर्णयातून आपल्या मामांना वाहिली श्रद्धांजली

Next Post

ब्रेकींग : दत्तात्रय मुळे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष ; बांधकाम क्षेत्रात सोलापूरची गरुड भरारी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : दत्तात्रय मुळे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र अध्यक्ष ; बांधकाम क्षेत्रात सोलापूरची गरुड भरारी

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972581
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group