सोलापूर : भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका प्रतिभा मुदगल यांचे पती सुनील मुदगल यांचे गुरुवारी काही वेळापूर्वी निधन झाले वडार समाजातील युवा आणि धडाडीचे नेते म्हणून सुनील मुदगल यांची सोलापुरात ओळख होती. दोनच दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक तीनच्या नगरसेविका विजयलक्ष्मी गड्डम यांचे पती भारतीय जनता पार्टीचे माजी मंडल अध्यक्ष, धडाडी कार्यकर्ता आणि समाजसेवक, लक्ष्मीकांत गड्डम यांचे निधन झाले होते.
त्यानंतर पुढील दोन दिवसानंतर प्रतिभा मुदगल यांचे पती सुनील मुदगल यांच्या निधनाने मुदगल कुटुंबीय आणि भारतीय जनता पार्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील मुदगल हे सोलापुरात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष होते मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र गुरुवारी त्यांचे निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय केवळ 39 होते, त्यांच्या पश्चात पत्नी-मुले आई-वडील असा परिवार आहे.


















