सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते विरभद्रेश बसवंती यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह देशाचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाला सुरुवातीला सुशीलकुमार शिंदे हे आले काही वेळाने खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे आगमन कार्यक्रम स्थळावर आगमन झाले, स्टेजवर येताना जयसिद्धेश्वर स्वामी यांना सुशीलकुमार शिंदे यांनी उठून सन्मान दिला, खासदार महास्वामी यांनीही सुशीलकुमार शिंदे यांच्या हातात हात देऊन अभिवादन केले. यावेळी प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्याची वेळ आली.
त्यावेळी जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा हात धरून आपल्या दोघांचा हस्ते दीपप्रज्वलन करून म्हणून सन्मान केला. त्यानंतर पुतळा अनावरण वेळीही स्वामी हे तुमच्या हस्ते म्हणून शिंदे यांचा सन्मान करताना दिसून आले. एकमेकांच्या शेजारी बसलेल्या या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ सोलापूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा रंगली होती तो क्षण आपल्या मोबाईल आणि कॅमेरा मध्ये टिपण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची स्टेज समोर मोठी गर्दी केली होती. नक्की पहा व्हिडीओ..


















