Friday, July 3, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन ! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना “शिस्ती’चा धडा देणाऱ्या पत्रकाराचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला सन्मान

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 April 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: ग्लोबल टीचर डिसले गुरुजी (Global Teacher Ranjit Disale) यांना बातम्यातून “शिस्ती’चा धडा देणाऱ्या लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक राजकुमार सारोळे यांना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांच्या हस्ते “शोध पत्रकारितेचा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

गोवा येथे रविवारी रात्री झालेल्या एका शानदार कार्यक्रमात लोकमत अचिव्हर्स अवार्ड प्रदान करण्यात आले. यात पत्रकार सारोळे यांचा हा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकमत वृत्तसमूहाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्रबाबू दर्डा, संचालक करण दर्डा, देवेन दर्डा, मुख्य संपादक विजय बाविस्कर यांच्यासह राज्यातील लोकमत आवृत्तीचे संपादक, व्यवस्थापक व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकमत परिवारअंतर्गत गेल्या वर्षभरात उत्तम कामगिरी केलेल्या टीमना पुरस्कार देण्यात आले. हा कार्यक्रम सुरू असतानाच मुख्यमंत्री डॉक्टर सावंत तेथे आले. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी त्यांना पुढील पुरस्कार घोषित करण्याची विनंती केली त्यामध्ये शोध पत्रकारितेचा पुरस्कार राजकुमार सारोळे यांना जाहीर करण्यात आला व मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. यावेळी सोलापूर लोकमत आवृत्तीचे निवासी संपादक सचिन जवळकोटे, सहाय्यक सरव्यवस्थापक  रमेश तावडे, हॅलोहेड रवींद्र देशमुख, वसुली विभाग प्रमुख मनोहर नवाल, वितरण व्यवस्थापक शिवप्रसाद क्यातमवार, लेखाधिकारी अविनाश ओलेकर, जाहिरात व्यवस्थापक संतोष सावळगी, सांस्कृतिक विभाग प्रमुख बोरोटीकर, आर्टिस्ट अशोक हिरासकर आदी उपस्थित होते.

जीवनातील सर्वोच्च पुरस्कार…

लोकमत परिवाराने केलेला हा सन्मान माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे, असे  सारोळे यांनी सिंहासनशी बोलताना सांगितले. माझ्या पुरस्काराच्या यशामध्ये निवासी संपादक श्री. जवळकोटेसर, सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. तावडेसर, हॅलोहेड देशमुख आणि सर्व संपादकीय टीमचा वाटा आहे, असेही त्यांनी नमूद केले.

यासाठी मिळाला हा पुरस्कार…

राजकुमार सारोळे ग्लोबल टीचर डिसले गुरुजी यांच्यावर वृत्तमालिका लिहिली होती. अमेरिकेच्या फुल्ब्राईट संस्थेने डॉक्टरेट साठी डिसले गुरुजींना शिष्यवृत्ती मंजूर केल्यावर रजा मागण्यासाठी ते जिल्हा परिषदेत आले होते. यावेळी शिक्षणाधिकारी किरण लोहार व डिसले गुरुजी यांच्यात झालेल्या संवादावरून सारोळे यांनी “लोकमत’ मध्ये “जिल्हा परिषदेच्या शाळेतसाठी तुम्ही काय केले’ अशी बातमी ब्रेकिंग केली होती. लोकमतच्या सर्व आवृत्तीमध्ये हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध झाले होते. या बातमीची राज्यभरातील सर्व वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांनी दखल घेतली. शेवटी शिक्षणमंत्र्यांनी हस्तक्षेप करून डिसले गुरुजींना रजा मिळवून दिली होती. पण पुढे डिसले गुरुजींच्या ग्लोबल पुरस्कारावरुन मोठे वादळ निर्माण झाले. अजूनही डिसले गुरुजीनी याबाबत प्रसारमाध्यमासमोर सत्य प्रकट केले नाही, हे विशेष.

SendShareTweetSend
Previous Post

महेश कोठेंनी खासदार स्वामींचे चरण स्पर्श करत काँग्रेस अध्यक्षाशी केले हस्तांदोलन ; शिंदे साहेब म्हणाले, महेश आमचाच

Next Post

भीषण अपघात : थांबलेल्या ट्रकला कारची धडक पोलिस कॉन्स्टेबलसह दोघे सख्खे भाऊ जागीच ठार ; वाचा सविस्तरपणे

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

भीषण अपघात : थांबलेल्या ट्रकला कारची धडक पोलिस कॉन्स्टेबलसह दोघे सख्खे भाऊ जागीच ठार ; वाचा सविस्तरपणे

ताज्या बातम्या

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

30 June 2026
सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

सोलापूरच्या आमदारांनी विडी कामगायांच्या घरात बसून ऐकली ‘मन की बात’

28 June 2026
अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
30 June 2026
0

दहा हजाराची लाच घेताना सोलापूर महापालिकेचा लिपिक अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन, फंड व इतर शासकीय रकमा...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

Our Visitor

1986501
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group