Saturday, May 30, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण थाटात ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा परिषदेला केल्या या सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 September 2023
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  सामर्थ्यशाली भारताच्या उभारणीत तरुण पिढीचे महत्व व  भूमिका खूप मोठी आहे. परंतु ही तरुण पिढी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञानाच्या महाजालात वेढलेली असून यांना सकारात्मक तंत्रज्ञानाची दिशा दाखवण्याचे काम शिक्षकवर्गांने अत्यंत सक्षमपणे पार पाडले पाहिजे, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सन 2020- 21, 2021-22  व 2022- 23 या तीन वर्षाच्या जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री विखे पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले,  शिक्षणाधिकारी(प्रा.) प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी(मा.) महारुद्र नाळे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, शहाजी पवार, नरेंद्र काळे, शशिकांत चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख व पुरस्कारार्थी शिक्षक उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. विखे पाटील पुढे म्हणाले की, नव भारताच्या उभारणीत सकारात्मक तंत्रज्ञान आधारित तरुण पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे. आजच्या तरुण पिढीसमोर समाज माध्यमाचे व त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीचे फार मोठे आव्हान आहे. यातून तरुण वर्ग गुन्हेगारीशी संबंधित घटनाना लवकर बळी पडत आहेत. या तरुण वर्गाला अशा घटना पासून दूर ठेवण्याची जबाबदारी शिक्षण व्यवस्थेवर येऊन पडलेली आहे. समाज माध्यमांमुळे उत्कर्ष ही होऊ शकतो व अधोगती ही होऊ शकते, त्यामुळे कशाचा स्वीकार करायचा याबाबत तरुणांना जागृत करण्याची भूमिका शिक्षकांनी घ्यावी, असेही त्यांनी सुचित केले.

 सध्याचे युग हे डिजिटल युग आहे असे म्हटले जाते. अशा डिजिटल युगात सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा डिजिटल करण्याबाबत जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सुचित केले. तसेच पुढील काळात शाळांमधून विद्यार्थ्यांची गळती होणार नाही. यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्गातील असतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांची शाळेतून गळती होऊ नये यासाठी विशेष लक्ष ठेवावे व त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असेही त्यांनी सुचित केले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आव्हाळे यांनी पुरस्कार प्राप्त सर्व आदर्श शिक्षकांना शुभेच्छा देऊन पुढील काळात ही त्यांच्याकडून उत्कृष्ट ज्ञानदानाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. मिराकले यांनी केले. यावेळी त्यांनी प्राथमिक शिक्षक विभागाच्या वतीने लोकसहभागातून प्राथमिक शिक्षण विभागाने सात ते आठ कोटीचा निधी जमवून शाळांचा शैक्षणिक विकास केल्याची माहिती दिली. तसेच चट्टोपाध्याय 118 शिक्षक लाभाचे आदेश लवकरच वितरित करण्यात येत असल्याचेही सांगितले. 

प्रारंभी राज्यगीत गायनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले, त्यानंतर दीप प्रज्वलन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मागील तीन वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.

                                                                     *******

SendShareTweetSend
Previous Post

मी समाजाची दहा वेळा माफी मागेन ; पालकमंत्र्यांवर भंडारा उधळण्यापूर्वी काय घडले ; मारहाण करणाऱ्या भाजपच्या अध्यक्षाने सांगितली हकीकत

Next Post

Dhangar Reservation | संयमी राधाकृष्ण विखे पाटील : त्यांनी पोलिसांना अटक करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत, पोलिसांनी आपले काम केले

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

Dhangar Reservation | संयमी राधाकृष्ण विखे पाटील : त्यांनी पोलिसांना अटक करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत, पोलिसांनी आपले काम केले

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980934
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group