सोलापूर शहरामध्ये आपला उद्देश साध्य करण्याच्या हेतूने संघटीतरीत्या टोळी प्रस्थापीत करुन टोळीच्या माध्यमातून साथीदारांसह जबरी चोरी करणे, मोटार सायकल चोरी करणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणा-या
१. आदित्य शैलेंद्र माने, वय-१९ वर्षे, रा. थोबडे मळा, देगांव नाका, सोलापूर, २. ओंकार संतोष नलावडे, वय-१९ वर्षे, रा. सुंदराबाई डागा शाळेजवळ, दमाणी नगर, सोलापूर, ३. संतोष दत्ता निजामपुरे, वय-२३ वर्षे, रा. बांधवस्ती, दमाणी नगर, सोलापूर
या टोळीतील इसमांना सोलापूर शहर, उर्वरीत सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षे या कलावधीकरीता तडीपार करण्यात आले आहे.



















