सोलापूर : राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे शुक्रवारी सोलापूर दौर्यावर आहेत. त्यासोबत माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या 61 निमित्त आयोजित कार्यक्रमासाठी राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे सुद्धा सोलापुरात आहे पालकमंत्री यांचे आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले
त्याच वेळेस महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या स्वागताला आमदार प्रणिती शिंदे, बाबा मिस्त्री, रामहरी रुपनवर, सुरेश हसापुरे यांच्यासह इतर कार्यकर्ते थांबून होते. भरणे मामा गाडीतून उतरताच आज सगळ कॉंग्रेसच दिसत आहे, महाविकास आघाडी आहे बरं का? आमदार ताई म्हणाल्या, आज फक्त काँग्रेसच आहे असे म्हणतात उपस्थितांमध्ये हशा पिकला, दरम्यान पालकमंत्री भरणे मामा आत जाणार तोपर्यंत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा ताफा आला, तो पाहताच पालकमंत्री म्हणून मामा यांनी स्वतःपुढे होऊन स्वागत केले, त्यानंतर आमदार प्रणिती शिंदेंनी स्वागत केले, नंतर सुरेश हसापुरे, हरीश पाटील, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री यांनी स्वागत केले.


















