सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची इंदापूर येथे भरणेवाडी निवासस्थानी सोलापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने रामनवमीनिमित्त सदिच्छा भेट घेतली. व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मामांना सोलापुरी चादरीवर त्यांची रेखाटलेली प्रतिमा भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान सोलापूरच्या विविध विषयावर व विकास कामावर चर्चा करण्यात झाली.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेता किसन जाधव, राष्ट्रवादी माजी नगरसेवक नागेश गायकवाड, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, मौला पटेल, उमेश जाधव साहेब, संतोष गायकवाड,अमोल जगताप, नागेश हिरेमठ, किरण शिंदे, गजू शिंदे, वसंत कांबळे, जय पतंगे, नागेश जाधव,दोस्ती ग्रुप व ईच्छा भगवंताची मित्र परिवार सोलापूर उपस्थित होता.


















