सोलापूर – जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच सोलापूर शहर जिल्ह्याच्यावतीने लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील समाज बंन्धु भगिनीना समाज व समाजहीतासाठी शैक्षिणिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक प्रबोधन, कला , साहित्य, वैद्यकिय क्षेञात उल्लेखनिय कार्य केलेल्या समाज बांधवाना तसेच बसव विचारांवर कार्य करणारे सामाजिक संस्था आदींना बसवरत्न २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे .
बसवेश्वर महाराजानी बाराव्या शतकात सर्व जाती धर्मातील लोकाना एकञीत आणून अनुभव मंटपाच्या माध्यमातुन सत्य व शिव याचा संगम घडवून आणले. मनुष्य हे आपल्या कर्मानेच लहान मोठा होवू शकतो व उत्तम कर्म हेच मानवीय जीवन जगण्याचे मार्ग आहे, शुध्द कर्म हे बसव विचाराचे पविञ संदेश आहे या संदेशाची गरज ही पुढील काळासाठी नितांत गरजेची आहे
म्हणून वरील क्षेञात उल्लेखनिय कार्य केलेल्या समाजबांधवाना बसवरत्न २०२२ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी बसव ब्रिगेड अखिल भारतीय लिंगायत युवा मंच सोलापूर शहर जिल्हा या संघटनेच्यावतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
तरी इच्छुकानी आपल्या पविञ कार्याचा संपुर्ण उल्लेख असलेला अहवाल खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करुन आपले अर्ज २५ एप्रिल २०२२ पर्यंत सादर करावे असे आवाहन बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यानी केले आहे.
⭕संपर्क नंबर व नाव
१)श्री.अमित रोडगे 8830902112,
२)प्रा. शिवलिंग अचलेरे 7620202030,
३)श्री.श्रीशैल भोगडे 8329382826,
४)श्री मल्लिकार्जुन बामणे (सर) 9665790035


















