पंढरपूर : मासिक वारी सोहळा श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र पंढरपूर असे चैत्री वारी साठी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांचा अपघात झाला. या अपघातात बारा वारकरी जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे ता. मावळ जिल्हा पुणे येथून पंढरपूरकडे येत असलेल्या भाविकांचे पिक-अप वाहन वेळापुर-पंढरपूर रोडवर पिराची कुरोली जवळ आज पहाटे झोपेमध्ये वाहनांचे नियंत्रण सुटून 33KV HT लाईनच्या खांबावर आपटले. त्यामध्ये 12 वारकरी जखमी असून 4 वारकरी गंभीर जखमी (परंतु धोक्याचे बाहेर) आहेत.
सर्व जखमी वारकऱ्यांना पुढील उपचाराकामी सोलापूर येथे हलवले आहे.


















