सोलापूर : यंदाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाने डॉल्बीला परवानगी नाकारल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या वतीने बुधवार 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिस प्रशासनाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा विश्वस्त समितीच्या सदस्यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटसमोर सकाळी दहा वाजल्यापासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त बर्वे सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले हे उपोषण गेटला तळ ठोकून आहेत .जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट कडे येणाऱ्या सर्व रस्त्यांच्या बाजूने बंदोबस्त ठेवण्यात आला असून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त पाहता होणार या आंदोलनाकडे संपूर्ण आंबेडकरी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.


















