सोलापूर : बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव महामंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मानवी साखळी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जयंती उत्सव मिरवणुकीत दोन बेस आणि दोन टॉप यांना परवानगी मिळाली पाहिजे अशा मागणीने मध्यवर्ती उत्सव महामंडळाने लक्ष वेधून घेतले.
एकीकडे जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे अचानक मध्यवर्ती महामंडळाने पार्क चौकांमध्ये रस्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. विनापरवाना रास्ता रोको केल्याने पोलिसांनी जयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, सदस्य आनंद चंदनशिवे, जयंती उत्सव अध्यक्ष रॉकी बंगाळे यांच्यासह आंदोलनात सहभागी सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


















