सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आंबेडकरी समाजात दोन गट पडल्याने माजी नगरसेवक अरुण भालेराव हे नकळत आनंद चंदनशिवे यांच्यावर चांगलेच जुळून आहेत चंदनशिवे यांच्याकडून त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे.
त्यातच पोलीस प्रशासनाने डॉल्बीला परवानगी नाकारल्याने समाजामध्ये संतापाचे वातावरण आहे यादरम्यान बुधवारी जयंती उत्सव विश्वस्त समितीच्या वतीने धरणे आंदोलन कार्यक्रम होता या आंदोलनात अरुण भालेराव यांनी पुन्हा पालकमंत्री भरणे यांच्यावर तोंडसुख घेतले,
एका जिल्ह्याचे पालक आहेत का अशा परिस्थितीत समन्वय साधून प्रश्न मार्गी लावावा परंतु त्यांच्याकडून असे काही होताना दिसत नाही अशा पालकमंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत पोलीस आयुक्त बैजल यांच्या झिंगाट नृत्यावरही त्यांनी नकला करत त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली…
अरुण भालेराव यांचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

















