Monday, May 18, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : ‘जय-भीम’च्या गगनभेदी जयघोषात सोलापुरात ‘प्रज्ञासुर्यास’ अभिवादन ; भिम अनुयायी झाले ‘नतमस्तक’

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 April 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनासाठी जनसागर लोटला ‘जय-भीम’च्या जयघोषात या भारत रत्न अभिवादन करताना भिम अनुयायी महामानवाच्या चरणी नतमस्तक झाले. 

सलग दोन वर्ष कोरोना महामारीमुळे आंबेडकर जयंती उत्सव साजरा झाला नाही, त्याच बरोबर शहरातील आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करता आले नाही मात्र 2022 सालात कोरोनाचे सर्व निर्बंध राज्यसरकारने उठवले आहेत. त्यामुळे यंदा भीमजयंतीचा अभूतपूर्व उत्साह  दिसून आहे.

सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आडे, जात पडताळणी समितीच्या सहाय्यक आयुक्त छाया गाडेकर, आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समितीचे सदस्य राजाभाऊ सरवदे, उत्सव अध्यक्ष अजित गायकवाड, जिल्हा परिषद कास्त्राईब संघटनेचे नेते अरुण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. 

बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या उपस्थितीत महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, उत्सव अध्यक्ष रॉकी बंगाळे, सदस्य आनंद चंदनशिवे यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते झाले.

काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष प्रकाश वाले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी गटनेते चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे, अंबादास करगुळे, बसवराज म्हेत्रे, मधुकर आठवले, हेमा चिंचोळकर, संध्याताई काळे, प्रमिला तूपलवंडे,नागनाथ कदम, एन के क्षीरसागर यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी महापौर श्रीकांचना यंनम, वंदना गायकवाड, इंदिरा कुडक्याल, राजाभाऊ माने यांच्या उपस्थितीत अभिवादन झाले. 

शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, शहर प्रमुख गुरुशांत दुत्तरगावकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भीमाशंकर म्हेत्रे, विजय पुकाळे यांच्या उपस्थितीत अभिवादन झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, महिला अध्यक्षा सुनीता रोटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. रिपाइं पीजी गटाच्या वतीने संस्थापक प्रमोद गायकवाड, नुतन गायकवाड यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी उपायुक्त बापू बांगर यांच्यासोबत येऊन पुष्पहार अर्पण केला.

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या मतीन बागवान, राम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून सामाजिक समतेचा संदेश देत अभिवादन झाले. माजी मंत्री भाजप नेते लक्ष्मणराव ढोबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत येत पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख यांनी अभिवादन केले.

यावेळी विविध मान्यवरांनी आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत ही जयंती शांततेत सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले. पोलिस प्रशासनाच्या वतीने पार्क चौकामध्ये सर्वत्र बंदोबस्त तैनात होता शांततेत सर्वांनी अभिवादन करावे यासाठी पोलीस प्रयत्न करत होते.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग- आंबेडकर जयंतीची जबरदस्तीने वर्गणी मागितल्याबद्दल खंडणीचा गुन्हा ; “चिंटू बेटा तू तो गया”

Next Post

सोलापुरात नोटांचा हार घालून युवकांचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापुरात नोटांचा हार घालून युवकांचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980321
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group