सोलापूर : प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध स्तरातून अभिवादन करण्यात आले शहरातील एस के फाउंडेशनच्या वतीने युवकांनी एकत्र येत आगळ्यावेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या, सर्व जाती-धर्माच्या कामगारांनी एकत्र येऊन तयार केलेला नोटांचा हार घालून अभिवादन केले. यावेळी एस के फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रविकांत कोळेकर,
उत्सव अध्यक्ष जीवन शिंदे, सुहास म्हात्रे,नितीन भिसे, विनोद सावंत,गौतम गायकवाड,व्यंकटेश म्हेत्रे, नितीन कोळेकर, सिध्दार्थ सोनवणे,सचिन हुवाळे, लखन ओव्हाळ,सनी गज्जम, आदर्श कांबळे, अमोल चंदनशिवे, अक्षय कोळेकर, रोहित चंदनशिवे, मनोज घोडके,श्रीकांत कांबळे आदी उपस्थित होते.

















