पंढरपूर : ईश्वर वठार ता. पंढरपूर येथे विश्वरत्न, परमपूज्य, बोधिसत्व, महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, घटनादिपती, घटनाकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. सुभाषराव माने सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पंढरपूर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य औदुंबर मेटकरी ईश्वर- वठार विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संजय देशमुख, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय सरवदे, पोलीस पाटील मोहन लवटे, ग्रामसेवक श्री. श्रीधर चेंडगे, शिपाई विनायक देशमुख इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















