सोलापूर : तालुका कृषि अधिकारी उत्तर सोलापूर कार्यालयात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी कृषि अधिकारी अभिषेक सापते यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्र सांगताना त्यांचे विचार आचरणात आणा असे आवाहन केले,
या कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, कृषि पर्यवेक्षक अमोल कांबळे, अनुरेखक अब्दुल सत्तार चौधरी, भारत जाधव, कृषि सहायक काशिनाथ नंदर्गी, सहाय्यक अधीक्षक कांचन शिंदे,संतोष साळी शिपाई रफिक शेख उपस्थित होते, कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने संपन्न झाला, उपस्थित मान्यवरांना अमोल कांबळे यांच्या वतीने मिठाई वाटप करून सांगता करण्यात आली.

















