सोलापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवास सुरुवात झाली असून दि. १७/०४/२०२२ रोजी सांगता मिरवणूक काढण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाने या मिरवणुकीला डॉल्बी बंदी केली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन पोलीस करत आहेत.
त्यानुषंगाने जयंती उत्सवांचे सार्वजनिक मंडळ ही डॉल्बी / डी. जे. सोलापूर शहरामध्ये आणु नये याकरीता १) पुणे रोड (दळवे पाटील) बाळे २) नवीन हैद्राबाद नाका ३) नवीन अक्कलकोट नाका ४) नवीन होटगी नाका ५) नवीन विजापूर नाका ६) नवीन तुळजापूर नाका ७) नवीन देगांव नाका या ठिकाणी दि. १३/०४/२०२२ रोजी पासून ‘अ’ व ‘ब’ सत्रात विशेष नाकाबंदी नेमण्यात आलेली आहे. सदर नाकाबंदी दरम्यान ६ वाहने, १६ बेस, १४ टॉप, १८ अॅप्लीफायर ताब्यात घेण्यात आले आहेत.


















