सोलापूर : 17 एप्रिल रोजी निघणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव मिरणुकीला पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी डॉल्बी साउंड सिस्टीमला परवानगी नाकारली आहे. त्यांच्या निषेधार्थ व या मिरवणुकीत 2 बेस व 2 टॉपला परवानगी द्यावी या मागणीसाठी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पार्क चौक डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या समोर लहान बालके निळे झेंडे हातात घेऊन घोषणाबाजी देत होते, डॉल्बी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, केस तर केस 16 बेस या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं, लहान मुलांच्या पाठीमागे महिलांचा मोठा समूह होता, मोठ्या उत्साहात त्या सहभागी झाल्या होत्या,त्याच्या पाठीमागे भला मोठा निळा झेंडा हातात घेऊन भीमसैनिक सहभागी झाले होते, त्यापाठीमागे जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी मोर्चात होते.
या मोर्चात महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, उत्सव अध्यक्ष रॉकी बंगाळे, विश्वस्त आनंद चंदनशिवे, खजिनदार पी आर बनसोडे, सहसचिव एन के शिरसागर, सचिव केरु जाधव, उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, पूनम बनसोडे, अमोल गोडसे, सिद्धेश्वर पांडगळे, रवी कोळेकर, संघप्रकाश दुड्डे, गौतम चंदनशिवे, आर के कांबळे, दादाराव सर्वगोड, सचिन शिराळकर, दीपक गवळी, अनिल वाघमारे, समीर पांडगळे, राहुल शिंदे,यांच्यासह वृद्ध महिला, बालक शेकडोंच्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला असता या ठिकाणी केवळ आनंद चंदनशिवे यांनी संबोधित करताना आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मध्यवर्ती महामंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.


















