Tuesday, May 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष पवारांवर नवी जबाबदारी ; या पदावर झाली नियुक्ती ; फेसबुकवर टाकली अशी पोस्ट

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
15 April 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यावर पक्षाने नवी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र संतोष पवार यांना प्रदान करण्यात आले आहे. ही निवड झाल्यानंतर  पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर नवी जबाबदारी म्हणून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय जयंत पाटील, सन्मानीय शिवाजीराव गर्जे यांनी माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली आहे. नव्या जबाबदारीचा मी मनःपूर्वक स्वीकार केला आहे. मी यापुढील काळातही साहेब, दादा आणि ताई यांचा विचार आणखी बळकट करेन. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहीन… अशी गोष्ट टाकली आहे.

तसेच

सर्वांना नमस्कार,

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून काम करणारा मी कार्यकर्ता आहे.

आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय अजित दादा पवार, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी साडेचार वर्षांपूर्वी मला राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. कार्याध्यक्ष म्हणून काम करताना मी पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते, प्रांतिक पदाधिकारी, सर्व विधानसभा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्व फ्रंटल यांना सोबत घेऊन काम केले. पक्षाच्या अडचणीच्या काळात मेळावे, आंदोलने, संघर्ष यात्रा, हल्लाबोल यशस्वी करून दाखवली. पक्षाच्या अभिप्राय अभियानात राज्यात अव्वल क्रमांक पटकाविला. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आमचा सन्मान केला.

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सहकार्यामुळेच मोठे झालेले लोक मध्यंतरीच्या काळात पक्ष सोडून गेले. या काळात साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात भव्य सभा घेतली. साहेबांचा सारथी बनायची संधी मिळाली. या सभेनंतर राज्यातील वातावरण बदलले. पक्षाच्या संघर्ष काळाचा आणि त्या ऐतिहासिक सभेचा घटक असल्याचा मला आजही अभिमान आहे.

मी सामान्यातील सामान्य माणसाला पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला. पक्ष संघटन आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. या कालावधीत मला साथ देणारे  नेते, जिवाभावाचे मित्र, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि हितचिंतक यांनी मोलाची साथ दिली. या सर्वांचे मी आभार मानतो.

आपल्या सर्वांची साथ व सहकार्यामुळेच मी हे करू शकलो. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : डॉल्बी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, पुन्हा घुमला केस तर केस 16 बेसचा नारा

Next Post

डॉल्बी मिरवणूक : पालकमंत्र्यांनी सांगूनही पोलीस आयुक्तांकडून कोणतीही परवानगी अद्याप नाहीच, अफवा नको

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

डॉल्बी मिरवणूक : पालकमंत्र्यांनी सांगूनही पोलीस आयुक्तांकडून कोणतीही परवानगी अद्याप नाहीच, अफवा नको

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980325
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group