सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे बहुजनांचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीस, ११ एप्रिल रोजी प्रारंभ झाला होता. १५ एप्रिल रोजी सायंकाळी पारंपारिक वाद्यांबरोबर लेझिमच्या तालावर तरूणाईच्या जल्लोषमय वातावरणात महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघाली.
कासेगांवातील बहुजन समाजातील युवक आणि तरुणाई या भव्य मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. त्यांच्या ‘जय ज्योति, जय क्रांती’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता सोलापूर तालुका पोलीस ठाणे अंतर्गत कासेगांव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
यावेळी सरपंचपती जनार्दन काळे, ग्रामपंचायत सदस्य निशीकांत पाटील, पांडुरंग हेडे, ज्योती क्रांती परिषदेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संभाजी गाजरे, संतोष भोजने, क्रांतीज्योती परिषदेचे युवक तालुकाध्यक्ष विश्वनाथ खारे, अण्णा हेडे, ज्ञानेश्वर रोकडे, महादेव रोकडे, पवन काळे, मारूती रोकडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















