Tuesday, May 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात रविवारी डॉ आंबेडकर जयंतीची ऐतिहासिक मिरवणूक ; पोलिसांनी केला वाहतूक मार्गात बदल

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 April 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : 2020 आणि 2021 या सालात कोरोना महामारीच्या लॉकडाऊनमुळे संपूर्ण देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा झाला नाही किंवा मिरवणूक काढता आली नाही. यंदा मात्र 2022 साली आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले गेले. त्यामुळे सोलापुरातील भीम जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्याचा निर्णय आंबेडकर अनुयायांनी घेतला. 

मात्र जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समिती यांच्याविरोधात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाची स्थापना झाली त्यामुळे समाजात उघडपणे दोन गट तयार झाले. पोलीस आयुक्तांनी या मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टिमला परवानगी नाकारल्याने शहरात संतापाचे वातावरण तयार झाले. धरणे आंदोलन, मोर्चा, रस्ता रोको करत लक्ष वेधण्यात आले. 

जयंती उत्सव मिरवणुकीमध्ये दोन टॉप आणि दोन बेस घ्यायला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आपण जाणार नाही मला तशी परवानगी देता येणार नाही या भूमिकेत पोलीस आयुक्त हरीश बैजल ठाम राहिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीत मिरवणूक परवाना हाती घेतल्यानंतर विश्वस्त समितीने ही मिरवणूक स्वतःच्या जबाबदारीवर काढणार असल्याचे सांगितले आहे.

 त्या पद्धतीने सोलापूर शहरात शनिवारी दिवसभर तयारी करण्यात येत आहे. सोलापूर शहरात तब्बल 12 तासाहून अधिक आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक चालते, यामध्ये शेकडो मंडळ सहभागी होतात. विविध देखावे सजावट आणि मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या आंबेडकरी सह इतर सर्व समाज पाहता संपूर्ण भारत देशात या मिरवणुकीची चर्चा असते.

रविवारी होणाऱ्या जयंती उत्सव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरातील वाहतुक मार्गात बदल केले आहेत.

■बंद करण्यात आलेला मार्ग –

मिरवणुकीच्या मार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथून सुरुवात.डफरीन चौक ,जुना एम्प्लॉयमेंट चौक, वाडिया हॉस्पिटल, चांदणी चौक, महापौर निवास ,रेल्वे स्टेशन, गांधी पुतळा ,भैया चौक, मेकॅनिक चौक, नवीपेठ ,दत्त चौक ,माणिक चौक, मधला मारुती ,मंगळवार पेठ पोलीस चौकी, बाळीवेस  मार्गे मिलिंद नगर या मार्गावरून मिरवणुकीत सामील होणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांचा वाहतुकीस व सदर मार्गावर पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे.

■पर्यायी मार्ग

विजापूर रोड वरून मंगळवेढा कडे जाणाऱ्या अन्ना प्राधिकरण चौक (आत्तार नगर), डी मार्ट,आसरा चौक ते महावीर चौक, गुरूनानक चौक संत तुकाराम चौक अशोक चौक ,शांती चौक, जुना बोरामणी नाका, मार्केट यार्ड रोड, जुना तुळजापूर नाका ,कारंबा नाका, जुना पुना नाका ,बाळे ,आबा मार्गे देगाव या मार्गाने वाहतुकीस परवानगी राहिली.

■रेल्वे स्टेशन हुन  शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना रेल्वे स्टेशन सात रस्ता रंगभवन चौक विजापूर वेस, बाकळे प्रेस कॉर्नर, भावसार पोत समाचार चौक गौतम चौक ते कुंभार वीस चौक बलिदान चौक ते सम्राट चौक शिवाजी चौक या मार्गाने वाहतुकीस परवानगी राहील

 ■जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग■

जड वाहतुकीसाठी विजापूर रोड कडून चौत्रा नाका प्राधिकरण चौक, अत्तार नगर डी मार्ट आसरा चौक महाविर चौक गुरूनानक चौक अशोक चौक शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केटयार्ड मार्गे पुणे महामार्ग व हैदराबाद महामार्ग

(सदर मार्गाने पुणे व हैदराबाद कडून विजापूरकडे)

तसेच मंगळवेढा कडून विजापूरकडे जाण्यासाठी बसवेश्वर तांडा डोणगाव सोरेगाव मार्गे विजापूर महामार्ग व मंगळवेढा कडून तुळजापूर व हैदराबाद कडून जाण्यासाठी नवीन देगाव टोल नाका डेंटल कॉलेज केगाव जुना पुना नाका कारंबा नाका जुना तुळजापूर नाका हैदराबाद महामार्ग असा राहील.

तसेच गुरूनानक चौक गांधीनगर सात रस्ता ते रेल्वे स्टेशन हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांसाठी मोकळा ठेवण्यात येत आहे हा आदेश 17 एप्रिल रोजी दुपारी एक ते रात्री बारा वाजेपर्यंत अमलात येईल असे पोलिस आयुक्तांनी काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त पहा ही जल्लोषी मिरवणूक ; ‘जय ज्योति, जय क्रांती’ च्या जयघोष अन् जल्लोषमय वातावरणात जयंतीची सांगता

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात आंबेडकर जयंती निमित्त असा असेल पोलीस बंदोबस्त

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकींग : सोलापुरात आंबेडकर जयंती निमित्त असा असेल पोलीस बंदोबस्त

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980344
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group