सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीचे उद्घाटन रविवारी दुपारी बारा वाजता महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही मध्यवर्ती अध्यक्ष यांच्या सोबतीने करण्यात आले. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी आयुक्तांनी दोन्ही मध्यवर्ती अध्यक्षांना सोबत घेऊन वंदना घेतली. आनंदा चंदनशिवे आणि महामंडळ अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी विश्वस्त समितीचे अध्यक्ष सुभानजी बनसोडे तसेच उत्सव अध्यक्ष अजित गायकवाड त्यांना हाताला धरून पूजेसाठी पाचारण केले सर्वांनी एकत्रित येऊन बुद्धवंदना घेऊन मिरवणुकीचे उद्घाटन केले….पहा व्हिडीओ


















