सोलापूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मातंग समाजातील अभ्यासू नेते उत्तम प्रकाश खंदारे यांचा बाबत खोडसाळपणा करण्यात आला असून फेसबुकवर चुकीची पोस्ट फिरत आहे, एका फेसबुक खात्यावरून ही पोस्ट फिरवली जात आहे या पोस्टमध्ये…..
अशी थेट पोस्ट केल्याने शहरात गोंधळ उडाला आहे. याबाबत शिवसेनेचे उत्तर तालुक्याचे नेते सुधीर गोरे यांनी ही अफवा असून कोणीही यावर विश्वास ठेवू नये उत्तम प्रकाश खंदारे यांची तब्येत अतिशय चांगली आहे ते घरी आहेत त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी त्यांनी प्रार्थना केली.
दरम्यान फेसबुक वर हि पोस्ट वाचल्या नंतर आंबेडकर नगर मधील खंदारे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे याप्रकरणी उत्तम प्रकाश खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता कोणीतरी जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे हा काय प्रकार अजून मला समजलेला नाही याबाबत मी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करणार आहे असे त्यांनी स्पष्टीकरण दिले.



















