सोलापूर : केंद्रातील मोदी सरकार सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर चे दर वाढवित असून त्यामुळे सर्वच वस्तूंचे भाव प्रचंड वाढले असून नागरिकांचे हाल सुरू आहेत यावरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांचे बगलबच्चे कंपनी कडून देशामध्ये मंदिर मस्जिद आणि भोंग्याचे राजकारण सुरू आहे. म्हणून झोपी गेलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे लाईन येथील नवल पेट्रोल पंप येथे भोंगा लावून महागाईचा पाढा वाचून मोदी सरकारचा, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर दरवाढीचा निषेध व्यक्त करून इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण तसेच महंगाई डायन हे गीत ऐकवण्यात येऊन मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे परिसर दणाणून गेला.
दरम्यान जनता महागाईने त्रस्त आणि मोदी सरकार जातीधर्मामध्ये भांडणे लावण्यात व्यस्त असा आरोप युवक अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी केला….
या आंदोलनात युवक कॉंग्रेस चिटणीस प्रवीण जाधव, शहर मध्य विधानसभा वाहिद बिजापुरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, राजासाब शेख, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, सुशीलकुमार म्हेत्रे, संजय गायकवाड, बाबुराव क्षीरसागर, सोहेल पठाण, शरद गुमठे, विवेक इंगळे, यासिन शेख, प्रतीक शिंगे, सुनील सारंगी, रोहन साठे, दिनेश डोंगरे, धीरज खंदारे, वैभव माने, गणेश वाघमारे, कृष्णा नाईक, अजय जाधव, रवी नाईक, अनिकेत भिसे, अन्वर फणीमल, प्रथमेश मुकणे, यांच्यासह इतर पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.


















