पंढरपूर : केवळ 21 वर्षाच्या तरूणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसिक तणावाखाली ही आत्महत्या आहे की इतर काही कारण याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
तुमची मुलं तासन् तास व्हिडिओ गेम खेळत असतील तर ही बातमी तुम्हाला सावधानतेचा इशारा देणारी असेल, वेळीच सावध व्हा… दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावातील 21 वर्षीय मुलाने पब्जी गेम खेळत असताना आपण सारखे सारखे हरतोय या मानसिक तणावाखाली जाऊन गावापासून म्हणजेच वेळापूर या गावी जाऊन आपल्या आई-वडिलांना व्हिडिओ कालच्या माध्यमातून बोलून सदर आपले लोकेशन आई-वडिलांना पाठवून दिल्यानंतर स्वतः विष प्राशन करून आपले जीवन संपवले तर आई वडील त्या लोकेशनचा मार्ग काढत त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मुलगा निपचित पडल्याचे पाहून अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मात्र या मुलाच्या मृत्यूनंतर अनेक तर्कवितर्क म्हणजेच नोकरी न लागल्यानेही विष प्राशन केल्याचेही बोलले जात आहे. याचा प्राथमिक तपास अकलूज पोलिस स्टेशनचे रमेश सुरवसे पाटील हे करीत आहेत तसेच पुढील तपास वेळापूर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.


















