सोलापूर : सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्स अंतर्गत आशा वर्कर्स गटप्रवर्तक इंडियन सोलापूर च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेच्या जिल्हाध्यक्षा पुष्पा पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
दरम्यान उमेश पाटील यांच्या सांगण्यावरून एका मागासवर्गीय आशा सेविकेवर अन्याय करण्यात आला असून त्या महिलेला तात्काळ कामावर घ्यावे अशी मागणी पुष्पा पाटील यांनी केली….



















