Wednesday, May 20, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मोठी ब्रेकींग : पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील एपीआय शीतलकुमार कोल्हाळसह सात पोलिसांवर गुन्हा दाखल ; सीआयडीने दिली फिर्याद

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 April 2022
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दरोडा व जबरी चोरी गुन्ह्यातील पारधी समाजातील आरोपी भीमा काळे याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हे अन्वेषण विभागाने फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या बरोबर इतर पाच पोलिसांवर गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. यापूर्वी डान्स बार प्रकरणात त्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले होते. आरोपी भीमा काळे याचा मृत्यू नंतर त्याची पत्नी आणि मुलांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थेट पोलिसांवर आरोप केला होता.

मयत : भीमा काळे

सिद्रामप्पा गजा, पोलीस उपअधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, सोलापूर पथक यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून वपोनि उदयसिंह शामराव पाटील, सपोनि  शितलकुमार मारुती कोल्हाळ,  पोहेकॉ  श्रीरंग तुकाराम खांडेकर,  पोना शिवानंद दत्तात्रय भिमदे,  पोना अंबादास बालाजी गड्डुम, पोशि अतिश काकासाहेब पाटील.  पोना लक्ष्मण पोमु राठोड, विजापूर नाका पोलीस स्टेशन, सोलापूर शहर या सात जणां विरुद्ध भादंविसक ३०४,३३०,१६६,३४ प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजापूर नाका पोलीस ठाणे अंतर्गत भादविसंक ४५४,४५७,३८० या गुन्हयातील आरोपी नामे भिमा रज्जा काळे, वय ४२ वर्षे, रा. भांबुरे वस्ती, पारधी वस्ती, कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर यास दि. २२/०९/२०२१ रोजी जिल्हा कारागृह सोलापूर येथुन सपोनि कोल्हाळ यांनी वर्ग करुन ताब्यात घेवून  न्यायालयाकडून त्याची दि. २२/०९/२०२१ रोजी ते दि. २५/०९/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेतलेली होती. पोलीस कस्टडीत असताना आरोपीस सर्दी, ताप, खोकला व उलटया होत असल्याने व दोन्ही पायास कशाचेतरी संसर्ग झाल्यामुळे व त्याचे दोन्ही पाय सुजल्याने त्यास उपचाराकरीता सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दि. २४/०९/२०२१ रोजी १४.२५ वा मेडीकल यादीसह सपोनि कोल्हाळ तत्कालीन नेम विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी उपचारास दाखल केले असता त्याच्यावर उपचार चालु असताना आरोपीत भिमा रज्जा काळे हा दि. ०३/१०/२०२१ रोजी २०.४५ वा मयत झाल्याने विजापूर नाका पोलीस ठाणे अ.म.र.नं. १११/२०२१ सी आर पी सी

कलम १७४ प्रमाणे मयत दाखल करण्यात आलेली आहे.सदर मयताचे झालेल्या तपासावरुन गुन्हयातील अटक आरोपी भिमा रज्जा काळे यांनी गुन्हा कबुल करावा व गुन्हयातील चोरीस गेलेला माल काढुन दयावा म्हणून त्यास गुन्हयाचे तत्कालीन तपासी अधिकारी सपोनि कोल्हाळ, पोहवा श्रीरंग तुकाराम खांडेकर, पोना  शिवानंद दत्तात्रय भिमदे, पोना अंबादास बालाजी गड्डम, पोशि अतिश काकासाहेब पाटील, व पोना  लक्ष्मण पोमु राठोड यांनी पोलीस कस्टडीतील आरोपीस मारहाण केली आहे.तसेच विजापूर नाका पोलीस ठाणे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह शामराव पाटील यांनी वि. ना.पो.ठाणे गु.र.नं. ३९५ / २०२१ कलम ४५४,४५७,३८० भादविसं या गुन्हयातील तपासी अधिकारी सपोनि कोल्हाळ यांना गुन्हयाच्या तपासामध्ये मार्गदर्शक सुचना दिलेचे दिसुन आले नाही. 

तसेच दि. २२/०९/२०२१ रोजी रात्री २०.०० वा चे सुमारास तपासीक अधिकारी यांनी यातील अटक आरोपी नामे मिमा रज्जा काळे यास त्यांचेसमक्ष हजर केले. त्यावेळी आरोपी हा लंगडत असल्याचे व त्याचे दोन्ही पाय काळसर दिसत असल्याचे निदर्शनास येवून सुध्दा आरोपीस वैदयकीय उपचाराची आवश्यकता असतानासुध्दा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे दिलेले मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे आवारात व प्रत्येक कक्षात सीसीटिव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवून त्याची छायाचित्रण जतन करण्याचे प्रशासकीय जबाबदारी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांच्यावर येते. परंतु विजापूर नाका पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण कक्षात सीसीटिव्ही कॅमेरा असने आवश्यक असताना सदर ठिकाणी उपलब्ध केला नाही.

आरोपीत मजकूर यांनी वि. ना. पो. ठाणे गु.र.नं. ३९५ / २०२१ मधील आरोपीत भिमा रज्जा काळे (मयत) यास केलेल्या मारहाणीमुळे झालेल्या जखमांकडे तसेच सदरील मयत ही मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे माहित असतानाही त्याची वैद्यकीय आजारपणे व मारहाणीमुळे झालेल्या जखमांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन तात्काळ वैद्यकीय मदत न पुरवता त्याच्या मृत्युस कारणीभुत झाले. या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी जी व्ही दिघावकर, नेम गुन्हे अन्वेषण विभाग भरारी पथक पुणे हे करीत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! पीएम किसान, पीक कर्जाचे अर्ज स्वीकारणार ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

Next Post

काँग्रेसच्या युवा नेत्याने केली आमदार अमोल मेटकरी यांच्यावार गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

काँग्रेसच्या युवा नेत्याने केली आमदार अमोल मेटकरी यांच्यावार गुन्हा दाखल करण्याची मागणी

ताज्या बातम्या

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026

क्राईम

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980386
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group