सोलापूर (गुरुशांत मोकाशी) सोमवारी दुपारी सोलापूर हैदराबाद महामार्गावर मार्केट यार्ड जवळ थांबलेल्या मालट्रकला ईनोवा कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत. त्यांमध्ये दोन महिला दोन पुरुष आणि एक लहान बाळाचा समावेश आहे तर जखमींमध्ये एक पुरुष तीन महिलांचा समावेश आहे. यामध्ये पाच वर्षाची एक बालिका किरकोळ जखमी झाली आहे. सिव्हील मध्ये डॉक्टरांनी मयत आणि जखमींची नावे सांगितली. मरण पावलेल्यामध्ये सचिन शितोळे 35, दिलीप जाधव वय 37, सोनाबाई जाधव 55, आरोही दिलीप जाधव, लाडू जाधव यांचा समावेश असून ईशा जाधव, विनायक घोरपडे, वर्षा शितोळे, रेखा जाधव अशी जखमीचे नांवे आहेत.


















