मुंबई : महाराष्ट्रात भोंग्यावरून भाजप नेते मोहित कंबोज चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांना टार्गेट करताना कंबोज यांनी चांगलाच पलटवार केला आहे. ते म्हणाले, संजय राऊत यांना क्रेडिट आणि डेबिट काय आहे हे माहीत आहे का? ते पैसे का दिले आहेत ते माहीत आहे का? ते 80 लाख रुपये घेतले आहेत की दिले आहेत.
युसुफ लकडावाला हे एक बिल्डर आहेत आणि राणा दाम्पत्यांनी काही वर्षांपूर्वी लकडावाला यांच्याकडून तो प्लॅट विकत घेतला आहे..
शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं होतं ती इमारत लकडावाला यांनी बांधलेली आहे. संजय राऊत हे अत्यंत खालच्या पातळीच राजकारण करत त्यांनी नवनीत राणा यांच्यावर आरोप करणं बंद करावं.
युसुफ लकडावालाची तुलना त्यांनी एजाज लकडावाला सोबत केली. युसुफ लकडावाला आज आपल्यात नाहीत परंतु युसूफ लकडावाला हे संजय राऊत यांचे मित्र होते ते शरद पवारांचे मित्र होते. राजीव गांधीपासून त्यांचे सर्व मित्र होते..
युसूफ लकडावाला यांच्यावर काही वर्षांपूर्वी इओडब्ल्यू कडून गुन्हा दाखल झाला होता परंतु आज ते हयातीत नाहीत. हेच संजय राऊत युसूफ लकडावाला यांच्या महाबळेश्वर येथील एवरशाइन हॉटेलमध्ये नाव बदलून तिकडे राहत होते त्यांच्याकडून सल्लामसलत घ्यायचे..
मेलेल्या व्यक्तींवर असे खोटे आरोप लावण्यात संजय राऊत यांनी थांबवावं या शब्दात कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला.






















