सोलापूर : सेटलमेंट येथील क्रिमीनल ट्राईबच्या जागेवरील अतिक्रमण काढणे, क्रिमीनल ट्राईबच्या जमिनीचा परस्पर केलेला व्यवहार केलेले संबंधीत भुखंड माफियांचे सखोल चौकशी करणे या प्रमुख मागाण्यांसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर सेटलमेंट येथील क्रिमिनल ट्राईबचे भूखंड बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शंकर जाधव, देविदास गायकवाड, गोपाळ नंदुरकर, राम गायकवाड, एस एल गायकवाड, विक्रम गायकवाड, विक्रम गायकवाड, सिद्राम गायकवाड, विलास लोंढे, युवराज जाधव, मोहम्मद इंडिकर, रेखा गायकवाड, पुष्पा गायकवाड, कमला जाधव, आशा काळे यांच्यासह संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होते.

















