सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवारी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अधिक माहिती घेतली असता, मोहोळ तालुक्यातील अनगर ही नव्याने नगरपंचायत झाली आहे. माजी आमदार राजन पाटील यांनी त्यानिमित्ताने अनगर भागातील शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
त्या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली. अजितदादा हे सोलापूर शहरात येणार की नाही हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शनिवार-रविवारी अजित पवार हे बारामती येथे असल्याने ते वाहनाने येऊन वाहनानेच बारामतीला जाणार असल्याचे बोलले जात आहे.


















