सोलापूर : एमआयएमचे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार यांच्या वतीने जुन्या प्रभाग क्रमांक सोळा मधील सुमारे आठशे कुटुंबियांना धान्याचे किट वाटप करण्यात आले. यावेळी एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांच्या उपस्थितीत हे किट टेम्पोमध्ये रवाना करण्यात आले. यावेळी कमरुल शेख, राजा शेख,शब्बीर पठाण, बुजरूक पठाण यांची उपस्थिती होती. दरम्यान फारूक शाब्दी यांनी जहागीरदार यांच्या कार्याचं कौतूक केले तर यावेळी फारूक शाब्दी यांनी जहागीरदार पुन्हा नगरसेवक व्हावे तर गाझी जहागीरदार यांनी शाब्दी हे आमदार व्हावे अशी दुवा केली….


















