धनगर जमातीबाबत दुजाभाव का ? धनगर जमातीला कोण वाली आहे का नाही ? महामंडळांच्या भाग भांडवलात मोठी वाढ करत असताना… धनगर जमात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी – मेंढी विकास महामंडळ का आठवले नाही ?
– अमोल बापू कारंडे, सदस्य धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य
सोलापूर : सामाजिक न्याय विभागाकडील 4 महामंडळांच्या भाग भांडवलात मोठी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल 500 कोटी वरून वाढवून 1000 कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे 300 कोटी वरून 1000 कोटी, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे 73.21 कोटी वरून 1000 कोटी आणि दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 50 कोटी वरून 500 कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल अभिनंदन…
मात्र, महाविकास आघाडीला यावेळी धनगर जमात आणि पुण्यश्लोक, अहिल्यादेवी होळकर शेळी – मेंढी विकास महामंडळ आठवले नाही. याबद्दल आश्चर्य वाटत असून, धनगर जमातीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत राज्यातला धनगर समाज संतप्त होऊन सरकारला जाब विचारत आहे. सरकारने आपली चूक सुधारावी. अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही..! असा, इशारा महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समिती सदस्य अमोल बापू कारंडे यांनी दिला आहे.

















