सोलापूर : एक मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मध्ये प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ठीक सात वाजता शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी सीईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर स्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन मानवंदना देण्यात आली…..
ध्वजारोहणानंतर स्वामी यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना हात जोडून अभिवादन केले यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेलकांदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार,प्रकल्प संचालक स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता कदम, कार्यकारी अभियंता कोळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल जाधव, शिक्षणाधिकारी किरण लोहार, कार्यकारी अभियंता अजनाळकर, शिक्षणाधिकारी भास्कर बाबर, उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















