सोलापूर : एक मे महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते ठीक सात वाजून 10 मिनिटांनी शासकीय ध्वजारोहण करण्यात येऊन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली.
ध्वजारोहणानंतर शंभरकर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांना हात जोडून अभिवादन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, भूसंपादन अधिकारी अनिल कारंडे जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार मोहोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

















