सोलापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनी सोलापूरातील नियोजित जिल्हाधिकारी नूतन कार्यालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह इतर अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
2009 साली सुरु झालेले महसूल भवनाचे बांधकाम अद्यापही पूर्ण झालेले नाही 30 एप्रिल पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महसूल भवनाचे उद्घाटन होणार होते मात्र काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे पालकमंत्री भरणे यांनी उपस्थित मक्तेदार आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. येत्या पंधरा दिवसात कोणत्याही परिस्थितीत महसूल भावना चे काम पूर्ण झालेच पाहिजे अशी तंबी पालकमंत्री भरणे यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना दिली. या इमारतीमध्ये जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी महसूल उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयसह तसेच मिटींग हॉल तयार होत आहेत.



















