सोलापूर : शहर पोलीस आयुक्तलयातील गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ प्रीती टिपरे यांना उत्कृष्ट कामाबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते. 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते टिपरे यांना प्रदान करण्यात आले.
2 वर्षाच्या गॅपनंतर यावर्षी महाराष्ट्र दिनाचा सोहळा अतिशय बहारदार झाला. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. 1 मे ध्वज संचलन दिवशी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पोलिसांची मानवंदना देण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे यांच्या नेतृत्वात महिला पोलिस प्लाटूनचे कमांडींग पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या या बहारदार सोहळ्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर पोलीस आयुक्त हरिष बैजल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पोलीस उप आयुक्त दीपाली धाटे, उपायुक्त वैशाली कडूकर, उपायुक्त बापू बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















