अक्कलकोट : मंगळवारी सायंकाळी 5:30 च्या दरम्यान अक्कलकोट शहरातील विकास हॉटेल जवळ असलेल्या लोकसेवा पान शॉप या दुकानास एका वाहनाने जोराची धडक दिली.दुकानासमोर पाणी पिण्यासाठी आलेल्या एका तरुणास किरकोळ दुखापत झाली.पण काही कळण्याच्या आत हा अपघात घडल्याने काही काळ या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती.सदर घटना पान दुकानात असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे.
याप्रकरणी टेम्पो नेमकं कोणत्या कारणाने धडक दिला हे समजू शकले नाही.परंतु सदर टेम्पो मात्र समोरील बाजूने पूर्वीपासून तोडमोडलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले.

















