राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर येथे १५ वित्त आयोगांतर्गत नगरपरिषद, नगर पंचायत आणि सोलापूर महानगरपालिका येथील ०३ संवर्गातील (वैद्यकीय अधिकारी MBBS 38 जागा, आरोग्य अधिपरीचारिका 38 जागा, व एम.पी.डब्लू-पुरुष 38 जागा) रिक्त असलेल्या पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सदरील पदांकरिता असलेल्या निकषानुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदभरतीमधील पदांची नावे, रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदांचे मानधन, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, पदभरती करिता नियम, अटी व शर्ती, अर्जाचा नमुना ह्या सर्व बाबींचा विस्तृत तपशील जिल्हा परिषद, सोलापूरचे अधिकृत संकेतस्थळ www.zpsolapur.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेले असून, सर्व बाबीनुसार पात्र ठरत असलेल्या उमेदवारांनी संकेतस्थळावरील जाहिराती सोबत असलेला अर्जाचा नमुना Download करुन आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह अर्ज समक्ष व्यक्तीशः उपस्थित राहून सादर करणेकामी या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे.
उमेदवारांकडून दिनांक ११/०५/२०२२ ते दिनांक २०/०५/२०२२ या कालावधीत कार्यालयीन वेळेत, सुट्टीचे दिवस वगळून सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० या वेळेतच अर्ज स्विकृती करण्यात येईल. अर्ज स्विकृती ही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इमारत तळमजला, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, (सिव्हील हॉस्पीटल) आवार, सी ब्लॉक शेजारी, सोलापूर या ठिकाणी करण्यात येईल.



















