वीज तारांची दुरुस्ती करताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने दोघांना विजेचा जोरात धक्का बसून ते दोघे गंभीर जखमी झाले असून एकाला गंभीर अवस्थेतील एकाला खाजगी रुग्णालयात तर दुसऱ्याला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
सोलापुरात बुधवारी वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीचे कामे केली जात आहेत. रामलाल चौक शाखे अंतर्गत सकाळी ११ वाजेच्या सुमारास वरिष्ठ तंत्रज्ञ शेख रब्बानी अहमद वय अंदाजे ३७ वर्षे व कंत्राटी कर्मचारी अझहर चाँद तांबोळी वय अंदाजे २२ वर्षे हे दोघे सिव्हील वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ के.व्ही. रामलाल चौक फिडरवर रेल्वे स्टेशन परिसरातील एका ठिकाणी विजेच्या तारांना लागणाऱ्या फांद्या छाटण्याचे काम करत होते. याकरिता त्यांनी महावितरणच्या शिडीगाडीची मदत घेतली होती.
तरीही काम करताना अचानक लागलेल्या शॉकमुळे ते जखमी झाले आहेत. त्यातील गंभीर असलेल्या एकाला शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल करण्यात आले असून दुसऱ्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे या कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट दिले होते का नाही याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

















