Wednesday, October 21, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस शुक्रवारपासून 17 दिवस बंद ; आता खासगी वाहन, एसटीने गाठावे लागेल पुणे

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
12 May 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर  दौंड ते सोलापूर दरम्यान ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेतल्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत, काहीअंशी रद्द केल्या तर काही गाड्यांचे मार्ग बदलले गेले आहेत. त्यात सोलापुरातून पुण्याला जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस व डेमू रेल्वे गाडीचाही समावेश आहे. मुंबई-पंढरपूर गाडीही रद्द झाली आहे. उद्यान एक्स्प्रेस ही रेल्वे साेलापूरपर्यंतच धावणार आहे. त्यामुळे एेन उन्हाळी सुटीत साेलापूरकरांच्या प्रवासांच्या आनंदावर विरजण पडले आहे. पुण्याला रेल्वेने सकाळी निघायचे जवळपास मार्ग बंदच झाले आहेत. त्यामुळे खासगी वाहन, एसटीने पुणे गाठावे लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या साेलापूर विभागाच्या वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर विभागाने सोलापूरच्या दिशेच्या बाजूस दौंड यार्डमध्ये सबवे  (रोड अन्डर ब्रीज) बांधण्यासाठी १३ ते २९ मे या १७ दिवसांसाठी वेगवेगळ्या कालावधीकरिता ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दरम्यान सोलापूर विभागातून धावणाऱ्या काही गाड्या रद्द, काहीअंशी रद्द तर काही मार्ग वऴवून धावणार आहेत.  


हुतात्मा, डेमू रद्द, शताब्दी, इंटरसिटी बंदच साेलापूर विभागातून पुण्यासाठी दरराेज सकाळी साडेसहा वाजता धावणारी हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी १३ मे ते २९ मे या दिवसासाठी रद्द केली अहे. याच कालावधीसाठी साेलापुर-पुणे डेमू रेल्वे गाडीही रद्द करण्यात आली आहे. २५ मे ते २८ मे या दरम्यान मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस सोलापूरपर्यंतच धावणार आहे. २६ मे ते २९ मे या दरम्यान मुंबई-बेंगलोर उद्यान एक्सप्रेस सोलापूर स्थानकाहून आपल्या ठरलेल्या वेळत सुटेल.


साेलापूरहुन पुण्याला जाण्यासाठी दुपारची इंद्रायणी एक्स्प्रेस बंदच आहे*   हैद्राबाद ते पुणे ही शताब्दी एक्स्प्रेसही बंद आहे. त्यामुळे हुतात्मा एक्स्प्रेसनेच प्रवास करावा लागत होता. पण आता १७ दिवस ती गाडीही रद्द झाली आहे. मात्र सोलापूरकडून दक्षिणेकडे जाणा-या किंवा नगरकडे जाणा-या मार्गावरील ट्रेन धावतील. त्यात अडचणी नाहीत.



काही काळासाठी या रेल्वेगाड्या केल्या आहेत रद्द

१२ मे ते २८ मे दरम्यान इंदोर-दौंड एक्स्प्रेस पुणे स्थानकापर्यत, हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस बार्शी टाऊन स्थानकापर्यंत धावेल

या गाड्या सोलापूर ऐवजी मिरज, कुर्डुवाडीमार्गे धावतील  काही गाड्या सोलापूरएेवजी मिरज, पुणे, कुर्डुवाडी या मार्गावरून वळविल्यात. १२ ते २९ मे विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस, २५ मे ते २९ मे काकिनाडा पोर्ट- लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेस, २५ मे ते २८ मे मुंबई- नागरकोईल एक्स्प्रेस, २८ मे राेजी तिरूवनंतपुरम सेंट्रल-मुंबई, पुणे- भुवनेश्वर, २७ मे राेजी लोकमान्य टिळक टर्मिनल – कराईकल, २७ मे साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेस


२५ मे ते २८ मे दरम्यान मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ही सोलापूरपर्यंतच धावेल, नांदेड-पनवेल एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकापर्यंत धावेल, २६ मे ते २९ मे मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेसही सोलापूर स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळेवर सुटेल. पनवेल-नांदेड एक्स्प्रेस कुर्डुवाडी स्थानकाहून ठरलेल्या वेळेवर सुटेल.

दौंड येथे चालणार काम, ५० गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

२६ ते २९ मे दरम्यान मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस एक तास उशिराने धावेल. मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने, मुंबई-चेन्नई दोन तास उशिरा धावेल.


१३ मे राजी साईनगर शिर्डी-चेन्नई एक्स्प्रेस अडीच तास उशिरा, १६ मे राजी कराईकल-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस एक तास तास उशिराने धावेल.

१३ मे ते १७ मे दरम्यान मुंबई –बंगळुरू एक्स्प्रेस ही दोन तास उशिराने, १२ ते १६ मे बंगळुरू-मुंबई एक्स्प्रेस, १२ मे १७ मे नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस, १३ ते १६ मे दरम्यान नागरकोईल-मुंबई एक्स्प्रेस एक तास दहा मिनिटे उशिराने धावेल. १४ मे राजी सेंट्रल -मुंबई एक्स्प्रेस या गाड्या एक तास दहा मिनिटे उशिराने धावतील.

उद्यान, नागरकोईल १३ ते १७ मे दरम्यान उशिराने धावणार*

रद्द करण्यात आलेल्या गाड्या : १४ मे ते २८ मे पंढरपूर-दादर एक्स्प्रेस, १३ मे ते २९ मे दरम्यान सोलापूर-पुणे हुतात्मा,सोलापूर-पुणे डेमू , पुणे, दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, बारामती ते दौंड, दौंड-पुणे डेमू, दौंड-पुणे शटल, बारामती-पुणे डेमू, पुणे- बारामती डेमू, पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस, सोलापूर डेमू, पुणे-दौंड डेमू, १९ मे ते २६ मे दरम्यान पुणे-भुसावळ स्पेशल, भुसावळ- पुणे, दौंड-बारामती डेमू, पुणे-निझामाबाद डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-पुणे डेमू रद्द, निझामाबाद- पुणे डेमू, पुणे-दौंड, बारामती-दौंड पॅसंेजर, निझामाबाद-पंढरपूर, पंढरपूर- निझामाबाद,

वरील सर्व माहिती रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे.

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकींग ! हाय व्होल्टेज तारांचा करंट लागून 2 कर्मचारी गंभीर ; रेल्वे स्टेशन जवळील घटना

Next Post

राजूर सोसायटीवर देवकते गटाचा झेंडा ; शेतकरी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

राजूर सोसायटीवर देवकते गटाचा झेंडा ; शेतकरी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002792
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group