Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन ! सोलापूर जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात राज्यात तिसरा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 May 2022
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर:- पुणे येथे शुक्रवारी यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी, (यशदा) येथील सभागृहामध्ये  महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागातील जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी  व निवासी वैद्यकीय अधिकारी यांची आढावा सभा आयोजित केलेली होती.

या सभेस आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील तसेच ऑनलाइन व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे  प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग  डॉ. प्रदीप व्यास व आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान  एन रामास्वामी  हे उपस्थित होते. या आढावा सभेमध्ये सन 2021- 2022 या आर्थिक वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला.  या वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याने प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये राज्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला असून जिल्ह्यात covid-19 संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही माता व बालकांना वेळीच  आरोग्य सेवा देण्यामध्ये जिल्ह्याचा आरोग्य विभाग यशस्वी ठरला आहे. सोलापूर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या व लोकसंख्येने पहिल्या दोन  क्रमांकाच्या जिल्ह्यांच्या मानाने अतिशय मोठा असतानाही व आरोग्य यंत्रणेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून हे यश संपादन केले आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप स्वामी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल कुमार जाधव आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ज्यामध्ये  जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे,  जिल्हा निवासी बाह्य संपर्क अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक,  आरोग्य सेवक व आरोग्य सेविका,  आशा स्वयंसेविका यासह इतर विभागाचाही सहभाग घेऊन दर्जेदार आरोग्य सेवा  देण्यामध्ये व जनजागृती करण्यात सोलापूर जिल्हा परिषद यशस्वी ठरली आहे.

प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत लवकरात लवकर (१२ आठवड्याच्या आत ) गरोदर माता नोंदणी,  गरोदर मातेची तपासणी तसेच त्यांचे संदर्भ सेवा,  बालकांचे लसीकरण, बालकांच्या संदर्भसेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांच्या तपासण्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम माझे मुल माझी जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे राबविल्यानंतर covid-19 संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही covid-19 लसीकरणा बरोबरच आरोग्य विभागाच्या टीमने या पण सेवा उत्तम रित्या लाभार्थ्यांना दिल्या.

मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी अति जोखमीच्या गरोदर मातांचा पाठपुरावा, त्यांना रक्तक्षय जंतदोष यावरील उपचार, सोनोग्राफीची सेवा, गरोदर मातांच्या रक्ताच्या विविध चाचण्या, संस्थेत प्रसुती झाल्यास जेवणाची सोय तसेच सदर लाभार्थ्याला घरी सोडण्याच्या सोयीसह प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व जननी सुरक्षा योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळवून दिला.

लक्ष्य ( LAKSHYA)  कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे अद्यावत प्रसूती कक्ष तसेच सांस (SAANS) कार्यक्रमाअंतर्गत सर्व आशा व आरोग्य कर्मचारी यांना न्युमोनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे प्रशिक्षण देऊन माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रशिक्षित करण्यात आले.

जिल्ह्यात जापनीज एनकॅफेलाईटीस लसीकरण यशस्वीरीत्या राबवून शाळा अंगणवाडी बंद असतानाही इतर विभागांचा सहभाग घेऊन हा कार्यक्रम राबविण्यात आला. 

“कोविड १९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर कोविड व्यतिरिक्त आरोग्य सेवा देण्याचे शिवधनुष्य पेलले आहे. आरोग्य विभागाने नियोजनपूर्वक सातत्य राखून अविरत काम केल्याचे फळ आज मिळाले आहे. मी माझ्या सर्व आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन करतो. भविष्यकाळात लोकसहभागातून अजून जास्त  प्रभावीपणे सेवा देण्यावर भर राहील”.

डॉ. शितलकुमार जाधव ( जिल्हा आरोग्य अधिकारी )

SendShareTweetSend
Previous Post

अजिंक्य, चारित्र्यसंपन्न योद्धा – स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज ; व्याख्याते निलेश देशमुख यांचा अभ्यासपूर्ण लेख

Next Post

केतकी चितळेवर उमेश पाटलांची तिखट पोस्ट ; चंपा म्हणे अश्या माकडा I फेकून माराव्या जोडा II नियतीला तू डर I कमी कर टरटर II

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

केतकी चितळेवर उमेश पाटलांची तिखट पोस्ट ; चंपा म्हणे अश्या माकडा I फेकून माराव्या जोडा II नियतीला तू डर I कमी कर टरटर II

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972711
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group