सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad Pawar) यांच्या बाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) ही चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्यावर संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हे दाखल झाले आहेत तिला मुंबई पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे. दरम्यान याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक मनोज कुलकर्णी (Congress Spokesman manoj kulkarni ) यांनी आपली प्रतिक्रिया देताना केतकी चितळे यांचा निषेध नोंदवला,
मागील अडीच वर्षापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भारतीय जनता पार्टी हे सरकार कसे पडेल यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी केतकी चितळे सारख्या माणसांना पुढे करून महाविकासआघाडी मधील नेत्यांना टार्गेट केले जात आहे, आता केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला आहे मात्र तिच्या मागे असलेल्या अदृश्य चेहऱ्यांना शोधून त्यांच्यावर ही गुन्हे दाखल करा अशी मागणी कुलकर्णी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली.

















