सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे हे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले त्या दिवशी लग्नाचा मोठा मुहूर्त असल्याने मामांचा दौरा घाई गडबडीत झाला. नियोजन भवन मधील सभागृहात धनगर समाजातील युवा कार्यकर्ते पालकमंत्र्यांना भेटायला आले होते. सर्वांच्या कपाळावर भंडारा होता त्यामध्ये प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर हे सुद्धा उपस्थित होते.
पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर भरणे मामा गडबडीत निघाले मात्र प्रशांत बाबर यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मामा गडबडीतच माझ्या भाच्याचे लग्न आहे सांगितले ना असे शब्द मामांच्या तोंडून निघाले तरीही बाबर यांनी त्यांना थांबवलेच आणि यावेळी शेखर बंगाळे याच्यासह युवकांनी पालकमंत्र्यांना निवेदन देत कपाळावर भंडारा लावून संध्या घोंगडे घातले तसेच विद्यापीठात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी मंजूर झाला आहे येत्या 31 मे च्या आत त्या कामाचा शुभारंभ झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. पहा हा व्हिडीओ

















