सोलापूर : उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी लिंबोडी या उपसा सिंचन योजनेसाठी पाणी उचलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रश्न सोलापूर जिल्ह्यात आता चांगलाच पेटला आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूर तालुक्याचे आमदार असल्याने त्यांच्या विरोधात आता संपूर्ण सोलापुरातील सर्व राजकीय पक्ष तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक आता एक होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना आमच्या हक्काचे एक थेंबही पाणी इंदापूरला येऊ देणार नाही अन्यथा आम्ही रान पेटवू, मला सत्तेची गरज नाही पालकमंत्री खबरदार…. या भाषेत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. पहा आमदार प्रणिती शिंदे या नक्की काय म्हणाल्या…

















