Monday, May 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Breaking : जिल्हाधिकारी, रेल्वे अधिकारी व पंढरपूर संस्थानच्या संयुक्त बैठकीत महत्वाचा तोडगा ; मानाच्या पालख्या आता…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
19 May 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर,दि.19 (जिमाका) : वारकरी प्रथा, परंपरेनुसार 10 मानाच्या पालख्या सरगम चौकातील रेल्वे रूळावरूनच जाणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, रेल्वेचे अधिकारी विभागीय विद्युत अभियंता पराग आकनूरवार, विभागीय वित्तीय व्यवस्थापक प्रदीप हिरडे, विभागीय ऑपरेशन व्यवस्थापक एल.के. रानयेवले आणि पालखी संस्थानचे प्रतिनिधी यांच्यामध्ये चर्चेतून तोडगा निघाला आहे.

पंढरपूरला वारी करण्याची खूप वर्षांची प्रथा आहे. यानुसार वारीला मानाच्या 7 पालख्या येतात, यात आणखी तीनची भर पडली आहे. मानाच्या 10 पालख्यांची उंची 12 फुटांपेक्षा जास्त आहे. यामुळे सरगम चौकातील रेल्वे पुलाच्या खालून जाता येत नसल्याने रेल्वे रूळावरून पालख्या जात होत्या. ही परंपरा खूप वर्षांची आहे. मात्र रेल्वेने यंदा रेल्वेचे विद्युतीकरण केल्याने 5.80 मीटर उंचीवरून हाय व्होल्टेज वायर जात असल्याने यामुळे काही धोका निर्माण होऊ नये, यासाठी यावर तोडगा काढण्यासाठी नियोजन भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी सांगितले की, कोरोनाचे निर्बंध हटविल्याने वारीचा उत्साह मोठा आहे. यामुळे यंदा 15 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. वारकरी संप्रदाय, प्रथा-परंपरा यांना महत्व आहे. मानाच्या पालख्यांचा मार्ग बदलणे योग्य ठरणार नाही. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारकरी परंपरेचा मान राखून पर्याय सूचवावे. वारकरी संस्थानांना विनंती की त्यांनी आपापले रथ, पालखी कमीत कमी वेळेत रेल्वे रूळ पार करावा. रथ किंवा पालखी वरून गेली तर इतर वारकऱ्यांनी पुलाच्या खालून जावे. मानाच्या पालख्या सोडून इतर पालख्या रेल्वे रूळाखालून किंवा इतर मार्गाने नेण्यात याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

विभागीय विद्युत अभियंता श्री.आकनूरवार यांनी सांगितले की, रेल्वेची भूमिका प्रथा-परंपरेनुसार सामजस्याची राहील. कुर्डूवाडी ते सांगोला विद्युत पुरवठा स्थगित करावा लागेल किंवा पालख्या जाईपर्यंत विद्युत तार हटवावी लागेल. दुसरा पर्याय वारी कालावधीत रेल्वे विद्युत इंजिनऐवजी डिझेल इंजिनचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रांताधिकारी तथा विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी  10 मानाच्या पालख्यांची माहिती दिली. संत तुकाराम महाराज रथाची उंची सर्वात जास्त 20 फूट आहे.  श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, श्रीक्षेत्र आळंदी (रथाची उंची 15 फूट), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू (रथाची उंची 20 फूट), श्री संत सोपानदेव समाधी मंदिर ट्रस्ट, श्रीक्षेत्र सासवड (रथाची उंची 14 फूट), श्री संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर (रथाची उंची 12 फूट), श्री संत मुक्ताई देवस्थान, मुक्ताईनगर (रथाची उंची-15 फूट), श्री संत एकनाथ महाराज देवस्थान संस्थान, श्रीक्षेत्र पैठण (रथाची उंची-14 फूट), श्री नामदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र पंढरपूर (रथाची उंची 14 फूट), श्री चांगावटेश्वर देवस्थान, सासवड (रथाची उंची 14 फूट), विठ्ठल-रूख्माई संस्थान कौंडण्यपूर (रथ नाही, वाहनातून पालखी) आणि श्री संत निळोबाराय संस्थान, पिंपळनेर (रथाची उंची 12 फूट) यापद्धतीने रथांची उंची आहे.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, संत सोपानदेव पालखी संस्थानचे मनोज रणवरे, संत मुक्ताबाई संस्थानचे शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पुरूषोत्तम उत्पात, सोपानदेव समाधी संस्थानचे सिद्धेश शिंदे, चांगावटेश्वर संस्थानचे अरूण दरेकर, शशिकांत जगताप आदी उपस्थित होते.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर : ‘लक्ष्मणरावां’साठी ‘विजयकुमार’ आले ; देशमुख मालकांच्या शुभेच्छाने ढोबळे सर भारावले

Next Post

एका ‘क्लिक’वर सिएमपीद्वारे प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार जमा ; राज्यात हटके उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

एका 'क्लिक'वर सिएमपीद्वारे प्राथमिक शिक्षकांचा 94 कोटी पगार जमा ; राज्यात हटके उपक्रम राबविणारी सोलापूर जिल्हा परिषद

ताज्या बातम्या

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026
सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

12 May 2026
अभिनंदन ! अरुण क्षीरसागर  यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

अभिनंदन ! अरुण क्षीरसागर यांची जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

12 May 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

6 May 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1980732
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group